Tips for Success in Life


जगण सोपं करणारी हातोटी 

१.मला नेमकं काय करायचं? विचारा स्वतःला! बड्या बड्या शब्दात त्याला म्हणतात,आत्मसंशोधन करा.सर्वप्रथम स्वतःला हेच विचारा कि,मला माझ्या क्षेत्रात नेमकं काय करायचं आहे? असं काय आहे जे मला मनापासून आवडतं.त्यात पैसे मिळो ना मिळो,मला तेच करायला आवडेल,असं काय आहे?
२.जे काय तुम्हाला आवडतं त्याच्याशी तुमची मूल्य,तत्वं जुळतात का? नुस्त आवडलं म्हणून नाही,त्या कामासाठी आवश्यक सचोटी,चिकाटी,मेहेनत घ्यायची तयारी आहे का?का आवडतं,म्हणून मंग तात्पुरते काहीतरी करायचे आणि मंग सोडून द्यायचे असं होत तुमचं?
३.घरचे काय म्हणतात? त्यांची साथ आहे का?नसेल तर तुमचं काम तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता का? अनेकदा घरच्यांचा पाठींबा नसेल तर बऱ्याच लोकांना कामावर फोकस ठेवण अवघड होत.
४.एकदम आयुष्याचं ध्येय ठरवू नका.एकदम फायनल तेच.व्यावसायिक जीवनातली छोटी छोटी पाउलं तुमचं करिअर घडवतात.म्हणून मंग छोट काम करायचं ठरवा.छोटे गोल सेट करा.ते पूर्ण झाले कि तुमचा आत्मविश्वास वाढेल.छोटे ध्येय,छोट्या मुदतीसाठी हे सूत्र लक्षात ठेवा.
५.सतत काम,चोवीस तास काम असं करू नका.मित्रमैत्रिणी,छंद,घरचे यांच्यासाठी वेळ काढा.बरीच गुणी मानसं सतत काम करून लवकर थकतात.तसं झालं म्हणजे वेगात पळून लवकर धाप लागली तर प्रवास पूर्ण कसा होणार?
६.स्पर्धा केलीच तर स्वतःशी करा,इतरांशी नाही.त्यामुळे दुसऱ्यांची ध्येय तुमची ध्येय बनता कामा नयेत.तुम्ही स्वतःचा प्रवास स्वतःच्या आनंदासाठी करा.तर जिंकाल!!

बदलांना आव्हान समजून पुढे जा !

१.वास्तविकता स्वीकारा:परिवर्तन हि जीवनाची वास्तविकता आहे.त्यांमुळे त्याला आव्हान समजून प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा.कारण प्रत्येक परिवर्तन पुढे जाण्याचा मार्ग दाखवते अथवा ध्येयाजवळ पोहोचवते.
२.अपेक्षा कमी असाव्यात:उदासीनतेचे मुख्य कारण म्हणजे आमच्या मनात अतार्किक इच्छा असतात.त्यांना स्वतापासून दूर करा.इच्छा कमी केल्यास त्या पूर्ण करणे सोपे जाते.
३.दुसऱ्यांदा संधी दवडू नका:परिस्थिती अनुकूल असल्यास तिचा फायदा घ्या.व अनुकूल नसल्यास चिंता करू नका.एक संधी हातून गेल्यानंतर दुसऱ्या संधीची वात पाहा.मात्र,ती संधी दवडणार नाही याची काळजी घ्या.
४.पुढचे पाऊल अगोदर टाका:यशस्वी लोक काहीही वेगळे करत नाहीत;पण ते वारंवार प्रयत्न करीत असतात.त्यात येणाऱ्या अडचणींमध्येही ते पुढचे पाऊल अगोदर टाकतात.तसेच चुकीच्या निर्णयानंतरही समस्यांमधून समाधान शोधण्याचा प्रयत्न करीत असतात.
५.प्रत्येक गोष्ट नियंत्रणात असू शकत नाही:ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांची चिंता करू नये.अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा,ज्या नियंत्रणात आणता येऊ शकतील.धैर्य ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
६.समस्यांवर खूप चर्चा करू नका:समस्यांवर वारंवार चर्चा करून त्यातून मार्ग निघत नाही.नकारात्मकता मात्र निर्माण होते.त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहा आणि त्यातून सर्वांना सांगा.निराशेतूनही आशेचा किरण शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.
७.ध्येयाकडे छोटी-छोटी पावले टाका:एकदम ध्येयाकडे लक्ष न देता छोटे-छोटे ध्येय ठरवा.ते सहजगत्या मिळू शकेल आणि पुढे जाण्याची उर्मी वाढेल.ध्येयाच्या दिशेने रोज एक छोटे पाऊल टाकल्यास ते ध्येयाजवळ पोहोचवेल.
८.इतरांची स्तुती करा:कोणत्याही लहानसहान मदतीसाठी इतरांची स्तुती केली पाहिजे.त्यातून स्वतःला आनंद मिळू शकेल.तसेच छोटे यशही मोठे वाटू लागेल.
९.स्वतःला महत्त्व द्या:आपल्या भावनांना वाव देण्याचा प्रयत्न करायला हवा.दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी मनातील गोष्ट सांगायला विसरू नका.
 

Most Reading